जीएसटीमुळे गुजरातचे नुकसान – नितीन पटेल

File photo...

अहमदाबाद – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी जीएसटी करामुळे गुजरातचे वर्षाला 4-5 हजार कोटींचे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. नितीन पटेल यांनी गुजरातचे नुकसान झाल्याचे सांगितले असले तरी भविष्यात या कराचा फायदा होईल असे म्हटले आहे.

कार्यक्षम आणि पारदर्शक करप्रणालीसाठी केंद्र सरकारने उचललेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. पटेल यांनी या जीएसटी लागू करण्याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्यांनी टीका सहन करून यासाठी पुढाकार घेतला. मोदी जर कोणता कायदा बनवित असतील तर बनवत असताना गुजरातचे हित लक्षात घेऊन बनविला जाईल, असा दावाही पटेल यांनी केला आहे.

मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना जीएसटीसाठीची प्रक्रिया सुरू झाली होती. पी.चिदंबरम आणि प्रणब मुखर्जी अर्थमंत्री असतानाही ही प्रक्रिया सुरू होती मात्र हा निर्णय अंमलात आणला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे पटेल यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)