प्रो कबड्डी लीग 2018 : गुजरातचा पुणेरी पलटनवर सहज विजय

नवी दिल्ली – प्रो कबड्डी लीगमध्ये गुरूवारी गुजरात फाॅर्च्युन जायंट्स आणि पुणेरी पलटन यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने पुणेरी फलटनवर सहज विजय मिळविला. गुजरातच्या संघाने पुणेरी पलटनचा 35-20 असा पराभव करत विजय संपादित केला.

विजेत्या गुजरात संघाकडून सचिनने 7, प्रापरंजनने 5 आणि कर्णधार सुनिल कुमार, रोहित गुलिया तसेच रूतुराज कोरावी यांनी प्रत्येकी 4 गुण मिळवून संघास विजय मिळवून दिला.

-Ads-

गुजरात संघाचा ग्रुप ए मध्ये 15 सामन्यापैकी हा 11 वा विजय ठरला. या विजयासह 63 गुणासह गुजरातचा संघ सहा संघाच्या गुणतालिकेत टाॅपवर पोहचली आहे. तर पुणेरी संघाचा 18 सामन्यापैकी नववा पराभव ठरला. पुणेरी संघ 47 गुणासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)