प्रो कबड्डी क्रीडा स्पर्धा 2018 : गुजरातचा हरियाणावर विजय

अहमदाबाद : गुजरात फॉर्च्यूनजायंट्सने प्रो कबड्डी लीग 6 मध्ये गुरूवारी पहिल्यादाच हरियाणा स्टीलर्स संघावर मात केली आहे. गुजरात संघाने हरियाणाचा 40-31 अशा गुणफरकाने पराभव करत विजय संपादित केला आहे.

पहिल्या सत्रात गुजरात संघाने हरियाणावर 21-15 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर गुजरातने दुसऱ्या सत्रातही खेळाच्या कामगिरीत सातत्य राखत हरियाणाचा पराभव केला. दुसऱ्या सत्रात हरियाणाने जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न  केला परंतु त्यांच्या डिफेंसच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी न केल्यामुळे पराभव पहावा लागला.

या विजयासह गुजरात संघ एकूण 58 गुणांसह अ गटात अव्वलस्थानी पोहचला आहे. तर हरियाणा संघ 26 गुणांसह खालून दुसऱ्या स्थानावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)