मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या

पुणे – मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे त्याचबरोबर आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे तसेच आदी मागण्यांसाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची सुरुवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरापासून झाली.

मराठा क्रांती (मुक) मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. घरासमोर घंटानाद करण्यात आले. पंधरा ते वीस कार्यकर्ते याप्रसंगी हजर होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट हे घरी असल्याने त्यांनी या आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्विकारले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गिरीश बापट यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. बापट यांच्या कसबा गणपती मंदिराजवळील कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले. याशिवाय खासदार वंदना चव्हाण आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घरासमोरही ठिय्या आंदोलन करण्यात आले.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)