काही वस्तूंवरील जीएसटी घटणार

रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी उपाययोजना

नवी दिल्ली: सरकार काही वस्तूवरील जीएसटी कमी करण्याच्या विचारात आहे. ज्या वस्तूवरील कर कमी होण्याची शक्‍यता आहे, त्यात हातमाग, हस्तकला वस्तू, सॅनिटरी नॅपकिन्स आणि काही सेवाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. या वस्तूवर सध्या 12 टक्‍के दराने कर लावला जाता. यातील बरेच उद्योग हे अनौपचारीक आरोग्याशी आणि रोजगार निर्मितीशी संबंधित काही वस्तू आणि सेवावरील कर कमी करण्याची गरज असल्याची मागणी उद्योजकांच्या काही संघटनानी लावून धरल्यानंतर सरकारने हा विषय हाताळायचे ठरविले आहे.

छोटे हस्तकला उद्योग कमी गुंतवणूक करून जास्त रोजगार निर्माण करतात. या उद्योगाचा जास्तीत जास्त विकास व्हावा याकरिता सरकारने भांडवल सुलभ केले आहे. त्याचबरोबर या क्षेत्राला 12 टक्‍क्‍यापेक्षा कमी कर लागावा यासाठी प्रयत्न चालू होते. या प्रयत्नांना आता यश मिळू लागले आहे. दरम्यान वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करून एक वर्ष झाल्यानंतर केंद्र सरकारने या कायद्यांत महत्त्वाचे बदल करण्याचे ठरविले आहे. या बदलांमध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचे (आरसीएम) नवे स्वरूप, करासाठी वहन पत न मिळणे, कॉम्पोझिशन स्कीमसाठीच्या सेवांची व्याख्या आणि इनपुट टॅक्‍स क्रेडिट आदींचा समावेश आहे. सध्याच्या कायद्यात 38 बदल प्रस्तावित आहेत. यातील काही बदल हे या आधी जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयांनुसार असतील, तर काही व्यापारी आणि उद्योग वर्तुळातील प्रतिनिधींनी सुचवल्यावरून होणार आहेत. केंद्र सरकारने या नियोजित बदलांबाबत संबंधितांकडून 15 जुलैपर्यंत मत मागितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)