ऑक्‍टोबरमध्ये जीएसटी कर संकलन 1 लाख कोटींपेक्षा जास्त 

नवी दिल्ली – ऑक्‍टोबर महिन्यांत वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून (जीएसटी) 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विट करून माहिती दिली. सरकारच्या अपेक्षेप्रमाणे हे उत्पन्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एप्रिल महिन्यानंतरच्या सहामाहीत जीएसटीची ही मिळकत पुन्हा एकदा 1 लाख कोटींच्या पार गेली आहे. तर मेपासून ऑगस्टपर्यंत ही मिळकत 90 कोटींपेक्षा अधिक होती. इतका चांगला महसूल मिळण्यामागील मोठे कारण म्हणजे कर्जाच्या दरांमध्ये कपात, कर चोरीवर लगाम आणणे होय.

सरकारी तिजोरीतील ऑगस्टमधील जीएसटीची मिळकत 93, 690 कोटी रुपये होती. या आठवड्यात सरकारला अर्थव्यवस्थेसंदर्भात दोन चांगल्या बातम्या मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे उद्योग सुलभतेत भारताच्या क्रमवारीत 50 स्थानांनी सुधारणा होऊन भारत 77 व्या क्रमांकावर पोहोचला. तर दुसरी बाब म्हणजे जीएसटीच्या महसुलात झालेली विक्रमी वाढ. जागतिक बॅंकेच्या माहितीनुसार, उद्योग सुलभतेबाबत भाराततील वातावरण वेगाने सकारात्मक होत असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)