जीवनावश्‍यक वस्तू होणार स्वस्त

निवडणुकांमुळे जीएसटी कपातीचा परिणाम


घरावरील जीएसटीच्या दरातही कपात होण्याची शक्‍यता

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली – निवडणुका जवळ आल्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटलींनी जीएसटीवरचा 18 टक्‍क्‍यांच्या टप्पा संपुष्टात आणण्याचे संकेत दिले आहेत. लवकरच सर्व वस्तूंवर समान कर आकारला जाईल, असे त्यानी सूचीत केले आहे. त्यामुळे आगामी काळात बऱ्याच वस्तू स्वस्त होणार आहेत. त्याचा सरकारला निवडणुकात फायदा होण्याची शक्‍यता आहे.

याशिवाय जीएसटीमधील 28 टक्‍क्‍यांचा टप्पा लवकरच काढून टाकण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. सध्या जीएसटीचे चार टप्पे आहेत. यातील 12 आणि 18 टक्‍के या टप्प्यांमध्ये सुवर्णमध्य काढला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. लवकरच देशात जीएसटी फक्‍त तीन टप्प्यांमध्ये आकारला जाईल. शून्य, 5% आणि उच्च प्रतीच्या वस्तूंसाठी आणखी एक टप्पा, अशा तीन टप्प्यांमध्ये जीएसटी असेल.

त्याचबरोबर जानेवारीत होणाऱ्या जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. त्या बैठकीत घर खरेदी करण्यावर लावण्यात येणाऱ्या जीएसटीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्‍यता आहे. जीएसटी परिषदेने शनिवारी 23 वस्तूंवरील कर कमी केला आहे. आता लवकरच घर खरेदी करू पाहणाऱ्यांना सरकार मोठा दिलासा देण्याची शक्‍यता आहे. निर्माणाधीन इमारती आणि बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी कमी करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)