दीड डझन वस्तूंवरील जीएसटी होणार कमी-टीव्ही, एसी स्वस्त

नवी दिल्ली: सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी सुमारे दीड डझन वस्तूंवरील जीएसटी कमी करून जनतेला थोडासा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. 28 टक्‍के कराच्या गटात असलेल्या सुमारे तीन डझन वस्तूंची संख्या कमी करून दीड डझनपर्यंत आणणार आहे. शनिवारी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत टीव्ही आणि एसीसह अनेक वस्तूंवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्‍के इतका कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात आलेली आहे.

सुमारे 1200 ते 1300 वस्तूंवर जीएसटी लागू असून त्यात अडीच ते तीन टक्‍के वस्तूंवर 28 टक्‍के जीएसटी आकारण्यात येतो. यामध्ये एयर कंडिशनरसारख्या चैनीच्या वस्तू आणि सिगरेट सारख्या अपायकारक वस्तूंचा समावेश आहे. मात्र सीमेंट सारख्या वस्तूवरील जीएसटी कमी होण्याचे शक्‍यता कमीच आहे. कारण सिमेंटवरील जीएसटी कमी केला तर सरकारी खजिन्यावर सुमारे 10,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

22 तारखेला जीएसटी कौन्सिलची दिल्ली येथे अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. तत्पूर्वी सरकार 99 टक्के वस्तू 18 टक्‍क्‍यांपेक्षा कमी जीएसटी गटात आणणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईत सांगितले होते. सन 2018-19 मध्ये जीएसटीचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा 50,000 कोटी रुपये कमी येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आलेली असली, तरी लोकसभा निवडणुकीतील लाभासाठी सरकार महसूलाची चिंता बाजूला ठेवत जीएसटी कमी करण्याचा जनतेला आकर्षित करणारा निर्णय घेण्याची दाट शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)