नोव्हेंबर महिन्यात जीएसटी कर संकलनात घट 

नवी दिल्ली: ऑक्‍टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात घसरण झाली आहे. मागच्या महिन्यातील 1 लाख कोटींच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 97,637 कोटी जीएसटी जमा झाला आहे. ऑक्‍टोबर महिन्यासाठी 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत एकूण 69.6 लाख जीएसटीआर 3 बी रिटर्न्स फाईल झाले. अर्थ मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांसाठी राज्यांना 11,922 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. 97,637 कोटी रुपयांमध्ये केंद्रीय जीएसटी 16,812 कोटी रुपये आहे. राज्याचा जीएसटी 23,070 कोटी रुपये आहे. 49,726 कोटी रुपये आयजीएसटीमधून मिळाले आहेत. आयजीएसटीमध्ये 24,133 कोटी रुपये आयातीतून आणि 8,031 कोटी रुपये सेसमधून गोळा झाले आहेत. एप्रिल महिन्यात जीएसटीमधून 1.03 लाख कोटी रुपये कर संकलन झाले होते.
मे महिन्यात 94,016 कोटी, जूनमध्ये 95,610 कोटी, जुलै मध्ये 96,483 कोटी, ऑगस्टमध्ये 93,960 कोटी, सप्टेंबरमध्ये 94,442 कोटी आणि ऑक्‍टोबरमध्ये 1,00,710 कोटी रुपये करसंकलन झाले होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)