आॅक्टोबरमध्ये जीएसटी संकलनाने केला ‘एक लाख कोटी’चा पल्ला पार

नवी दिल्ली – आॅक्टोबर महिन्यात जीएसटी भरणा करण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले असून आॅक्टोबरमध्ये जीएसटी संकलानाने ‘एक लाख कोटी रूपयां’चा आकडा पार केला आहे.

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी ट्विट करत म्हटलं आहे की, जीएसटीचा कमी दर, कर चोरीमध्ये झालेली कमी, जीएसटीच्या रिटर्न फाईल वाढल्याने, देशभरात समान कर आणि अधिकाऱ्यांचा नगण्य हस्तक्षेप या सर्वा कारणांमुळे आॅक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन हे एक लाख कोटीच्या पुढे गेले आहे.

भारतात जीएसटी हा मागील वर्षात एक जुलैपासून लागू करण्यात आला होता. दरम्यान,  सप्टेंबरमध्ये 93,690 कोटी रुपयांचा जीएसटी जमा करण्यात आला असल्याची नोंद झाल्याचे अर्थमंत्रालयाकडून सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आली होती. सप्टेंबरमध्ये 67 लाख जीएसटी रिटर्न फाईल जमा करण्यात आल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)