राज्यभरात 1 कोटी बालकांना गोवर-रुबेलाचे लसीकरण

मुंबई: संपूर्ण राज्यभर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या दहा दिवसांत 1 कोटी 8 लाख बालकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरणाचे 35 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 60 टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण करून भंडारा जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. ही लस संपूर्ण सुरक्षित असल्याचे सांगत पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी केले आहे.

मोहिमेत आतापर्यंत 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील 16 लाख 27 हजार बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 5 ते 10 वर्ष वयोगटातील 41 लाख 55 हजार आणि 10 ते 15 वर्ष वयोगटातील 51 लाख 6 हजार मुला-मुलींना लसीकरण करण्यात आले. मोहिम सुरु झाल्याच्या 10 दिवसात एकूण राज्याच्या अपेक्षित लाभार्थ्यांपैकी 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत 100 टक्के गोवर रुबेला लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय निश्‍चित केले असल्याचे डॉक्‍टर सावंत यांनी सांगितले.

-Ads-

कडेगांव सांगली येथील मदरशांमधील 100 टक्के मुलांनी लसीकरण करून घेतले असून राज्यभरात ज्या ठिकाणी लसीकरणाबाबत गैरसमजातून नकार देण्यात आला आशा शाळांमधूनही आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

काही ठिकाणी लसीकरणानंतर मुला-मुलींना किरकोळ स्वरूपाचे दुष्परिणाम जाणवून आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रथमोपचार करून खबरदारीचा उपाय म्हणून काही मुलांना दवाखान्यात दाखल करून त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र काही तासानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले. राज्यातील एकूण शाळांपैकी 96 हजार शाळांमध्ये लसीकरण सत्रे यशस्वीपणे राबविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)