विद्युत तार तुटल्याने उसाचा फड पेटला

हळदीच्या बियाण्यांसह झाडेही जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

भुईंज – ओझर्डे, ता. वाई येथील अमराई नावाच्या शिवारातील दोन प्रगतीशील शेतकऱ्यांच्या उभ्या उसाच्या पिकात विद्युत वाहक तार तुटल्याने लागलेल्या आगीमुळे उसासह हळदीचे गडे जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती गाव कामगार तलाठी डी. डी. कुंभार यांनी दिली.

ओझर्डे येथील अमराई नावाच्या शिवारात चंद्रराव कुष्णराव पिसाळ (वय 70) यांच्या मालकीचे गट नंबर 1140 मध्ये 10 गुंठे उभ्या उसामध्ये वरून जाणाऱ्या विद्युत तारांपैकी एक तार आज पहाटेच्या सुमारास तुटून पडल्याने उसाला आग लागली. ऊसाला लागलेल्या आगीत बांधावर असणारी झाडेहु जळून खाक झाली आहेत. शिवार पेटत्या उसाच्या क्षेत्राला लागलेली आग वाऱ्याने पुढे सरकत शेजारीच गट नंबर 1148 मधील संदीप शिवराम धुमाळ यांच्या मालकीच्या क्षेत्रातील हळदीचे बियाणे असलेल्या गड्याची रचलेली आयरणीपर्यंत पोहोचली. आगाती हळदीचे गंडे जळून खाक झाले आहेत.
त्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती विद्युत मंडळाचे लायनमन अरुण गायकवाड यांनी त्याचे असलेले शाखा अभियंता देशमुख यांना कळविले आहे.

गेल्याच महिन्यात विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे कॅनॉल पाट शिवारातील माळ नावाच्या परिसरातील पाच शेतकऱ्यांचा जवळपास आठ एकर उसाच्या फडात वरून जाणाऱ्या विद्युत तारा तुटून पडल्याने ऊस जळून खाक होऊन 5 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. अशाच पद्धतीने वीज मंडळाच्या तारा तुटून गलथान कारभाराचे फटके शेतकऱ्यांना बसु लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. सुरु असलेला गलथान कारभारात विद्युत मंडळाने दुरुस्ती न केल्यास शेतकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)