विविध संस्था आणि संघटनांनी केले आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

पुणे – लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहराच्या विविध परिसरांमधील पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी अभिवादन केले. तसेच विविध संस्था आणि संघटनांनी कार्यक्रमांचे आयोजन करत त्यांना आदरांजली वाहिली.

पुणे शहर कॉंग्रेस क्रीडा सेल
सेलचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी विनोद पुरोहित, रोहित गुरव, वेदांत जाधव, नितीन जोशी, सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते.

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती
समितीच्या वतीने अध्यक्ष ऍड. फैयाज शेख यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी संजय मोरे, भरत जाधव, सुनील पंडित, संदीप मोरे, अविनाश बहिरट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रियदर्शिनी शिक्षण संस्था
संस्थेच्या अध्यक्षा शशिकला कुंभार आणि महेश कुंभार यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी वर्षाराणी कुंभार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
पार्टीचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि सामाजिक न्याय अध्यक्ष विजय डाकले यांच्या उपस्थितीत आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, पंडित कांबळे, संजय गायकवाड, संदीप गाडे, शंकर तेलंगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन
फाउंडेशनच्या वतीने बोपोडी, औंध, शिवाजीनगर, सातववाडी आदी ठिकाणी मधुमेह, रक्‍तगट, डेंग्यू, हृदय तपासणी करण्यात आली. तर पुणे स्टेशन, ताडीवाला रोड, सिंहगड रोड आदी भागांमध्ये अपंग महिलांना साडी वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन सोनावणे, पंकज शहा, कल्पना गंजीवाले, कविता पितांबरे आदी उपस्थित होते.

शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी
कमिटीच्या वतीने कार्यालय सचिव उत्तम भुमकर आणि आबासाहेब यांच्या हस्ते आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शेखर कपोते, सनमित चौधरी, मनोहर गाडेकर, हेमंत नवलखा आदी उपस्थित होते.

झोपडपट्टी सुरक्षा दल
दलाच्या वतीने अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख, महिला अध्यक्ष सुरेखा भालेराव, सुनीता अडसुळे, सरचिटणीस काशिनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

दलित पॅंथर
पॅंथरच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पुणे शहर अध्यक्ष गणेश नायडू, अजय वंडगल, किरण ठोगे आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयातील आण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रास प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, अजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. धनंजय लोखंडे, ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र, प्रा. डॉ. बनसोडे, प्रा. देसले, डॉ. सुनील धिवार, कल्याण खैरे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)