नदी पात्रातील बेकायदा वृक्षतोड थांबवण्याची ग्रीन रिव्होल्युशनची मागणी

पुणे: सिंहगड रस्ताच्या नजिकच्या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली असून तेथील अतिक्रमणे काढण्याच्या नावाखाली वृक्षांची होणारी तोड त्वरीत थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रीन रिव्होल्युशन या संघटनेतर्फे अध्यक्ष किशोर राजपुत यांनी महापालिका वृक्ष अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की हरितलवादाने नदीच्या पात्रातील बेकायदा भराव आणि अतिक्रमणे काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.

हा आदेश चांगला आहे पण या आदेशानुसार भराव आणि अन्य बांधकाम काढून टाकताना त्या पात्रातील जुन्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे ही अत्यंत गंभीर बाब असून त्या प्रकरणात महापालिकेने त्वरीत हस्तक्षेप करून संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी राजपुत यांनी या निवेदनात केली आहे. आत्तापर्यंत तेथे खूप वृक्षतोड झाली असून यापुढील वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न महापालिकेने करावा असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)