हत्तीतलाव :पावसामुळे सातारा शहराच्या पश्चिम भागाने जणू हिरवा शालू नेसला असून घाट रस्त्यावरून थांबून साताऱ्यातील हत्तीतलावाचे मनमोहक दृश्य पर्यटकांना मोहिनी घातल्याशिवाय राहत नाही.
यवतेश्वर :कास पठाराकडे जाणारा घाट रस्ता पावसामुळे निसर्गसौंदर्याने नटला असून या मार्गावर सुरक्षा कठड्यांवर बसलेली ही वानरसेना पाहण्यासाठीदेखील पर्यटक आवर्जून थांबून वानरसेनेच्या मर्कटलीलांचा आनंद घेत आहेत. तसेच घाटातील धबधब्यांचे तुषार अंगावर झेलत पुढच्या प्रवासाला निघत आहेत.
कास पठार :फक्त आणि फक्त पावसाळ्यातच दिसणारी भूछत्र वनस्पती पर्यटकांना आकर्षित करत आहे.
कास :गत दहा-बारा दिवसांपासून सातारा शहराच्या पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसाने ओसंडून भरलेल्या कास तलावातून खळाळत वाहनारे पाणी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. (सर्व छाया : संजय कारंडे)