अमेरिकेतील “ग्रीन कार्ड’ची मर्यादा होणार रद्द

विधेयक मंजूर झाल्यास एच1बी व्हिसा असलेल्या हजारो भारतीयांना लाभ

वॉशिंग्टन : अमेरिकेत वास्तव्य करण्यासाठी ग्रीन कार्डबाबत प्रत्येक देशांबाबत असलेली मर्यादा संपुष्टात आणण्याबाबतची विधेयके अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी आणि सिनेटमध्ये मांडण्यात आली आहेत. या विधेयकांचे कायद्यामध्ये रूपांतर झाल्यास अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी कायदेशीर वास्तव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

सिनेटमध्ये रिपब्लिकन नेते माइक ली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्या कमला हॅरिस यांनी फेअरनेस फॉर हाय-स्किल्ड इमिग्रण्ट्‌स ऍक्‍ट (एचआर 1044) विधेयक मांडले. त्यामुळे रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा दूर होणार आहे.

लोकप्रतिनिधी सभागृहात कॉंग्रेस नेते झो लॉफग्रेन आणि केन बक यांनी मांडले. हे विधेयक कॉंग्रेसने मंजूर केल्यास आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास एच1बी व्हिसा असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना लाभ होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)