अथेन्स – ग्रीसमधील न्यू डेमोक्रसी पार्टीचे नेते क्यारियाकोस मित्सोताकिस यांनी सोमवारी ग्रीसचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
निवडणुकीमध्ये डाव्या विचारांच्या “कोअलेशन ऑफ रॅडिकल लेफ्ट’ पक्षाच्या ऍलेक्सिस त्सिप्रास यांच्यावर मित्सोताकिस यांनी विजय मिळवल्याचा निकाल रविवारी जाहीर झाला.या निकालामुळे त्सिप्रास यांची गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेली सत्ता संपुष्टात आली.