नागपूरमधील किंग्जवे रुग्णालयाला भीषण आग

नागपूर: नागपूर येथे बांधकाम सुरू असलेल्या किंग्जवे रुग्णालयात भीषण आग लागली होती. ही आग नियंत्रणात आली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून अडकलेल्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

एलआयसी ऑफिसच्या परिसरातील या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी दोनच्या सुमारास आग लागली होती. किंग्जवे रुग्णालयाच्या अर्ध्या इमारतीमध्ये बांधकाम सुरू होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सगळ्यात धक्कादायक म्हणजे ही इमारत काचेची आहे. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. तर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)