देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

मुंबई: २०१४ मध्ये आलेला दुष्काळ अनुदान वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये देवस्थानची जमीन कसणाऱ्या कास्तकारांना अनुदान मिळावे अशी मागणी होती. सरकारने काही अटीच्या अधीन राहून ही मागणी मान्य केली आहे.

शासनाने देवस्थानची जमीन व कास्तकार (कसणारे शेतकरी) अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शेतकऱ्यांना मालकी हक्क किंवा कुळाचा कोणताही दावा करता येणार नाही, असे स्पष्ट केले. या अटीच्या अधीन राहुन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)