चंद्रपुरात आजीसह नातीची गळा आवळून हत्या 

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात आज बालाजी वॉर्ड परिसरात आजी आणि नातीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. सुशीला पिंपळकर (वय 52), तर श्वेता राजपूत (वय वर्षे 7) अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. श्वेता ही सुशीला यांच्या मुलीची मुलगी होती. सुशीला पिंपळकर आणि त्यांची सात वर्षीय नात श्वेता राजपूत आज सकाळी फरशीवर पडल्याचे निदर्शनास आले. या दोघींची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुशीला पिंपळकर या विधवा होत्या. त्यांना तीन मुली आहेत. मयत श्वेता राजपूत ही मुलीची मुलगी होती. घरात काही ठिकाणी आरोपींनी जाळपोळ करुन पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. या दुहेरी हत्या प्रकरणात ओळखीची व्यक्ती सामील असल्याची दाट शक्‍यता असल्यामुळे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)