भाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी 

प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्यात चर्चा 
मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरू केलीे असतानाच दुसरीकडे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि लोजदचे प्रदेशाध्यक्ष आमदार कपिल पाटील यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात महाआघाडी स्थापन करण्यासाठी या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधातील पक्ष चर्चेसाठी एकत्र यायला सुरूवात झाली आहे.विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू झाले आहेत.याचाच एक भाग म्हणून दादरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी बैठक झाली. या तिघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. बहुजन वंचित आघाडीने उपस्थित केलेले प्रश्न, शेतक-यांच्या मागण्या, राज्यातील डाव्या पुरोगामी पक्षांच्या भूमिकांना सामावून घेउन व्यापक आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे यावर तिघाही नेत्यांमध्ये सहमती झाली.
राज्यात होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी आणि महागाई, तरूणांमधील अस्वस्थता, दलित अल्पसंख्यांक आणि ओबीसी समाजात असणारी भिती यामुळे भाजपा विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक भूमिका घेउन विरोधकांना सोबत घेउनच पुढे गेले पाहिजे यावर तिन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. भाजपाला सत्तेवरून दूर करणे हाच विरोधी पक्षांचा एकमेव कार्यक्रम असायला हवा, असे मत खा.राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्‍त केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)