“महाआघाडी’ एक अपयशी प्रयोग 

अरुण जेटली यांनी शक्‍यता फेटाळली 
नवी दिल्ली: भारतामध्ये महाआघाडी करण्याचा प्रयोग पूर्वीही झाला आहे. मात्र ही कल्पना अपयशी झाली आहे. जर 2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये ही कल्पना राबवली गेली तर ही निवडणूक समर्थ नेत्याच्या स्थिर सरकारविरोधात अराजक एकत्रीकरण अशी असेल, असे मत केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्‍त केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या विजयाबद्दल जेटली यांनी विश्‍वास व्यक्‍त केला. विकासाच्या वाटेवर देशाचे मार्गक्रमण सुरू असताना अशाप्रकारे अराजक एकीकरणाचा प्रयोग करण्याची ही वेळ नाही, असेही जेटली म्हणाले.
यापूर्वी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी करून झाली. व्हि.पी. सिंह यांनीही तसा प्रयोग करून बघितला. चरण सिंह, आय.के. गुजराल आणि देवेगौडा यांच्याही नेतृत्वाखाली महाआघाडीचा प्रयोग करून झाला. या प्रयोगामुळे धोरण मारले जाते आणि सरकारचे दीर्घायुष्य केवळ काही महिने राहते. त्यामुळे अशी महाआघाडी करून झाली. ही कल्पना खूप मनोरंजक आहे. पण मोठी आघाडी करण्यासाठी मोठे केंद्र आणि त्याभोवती फिरणारे छोटे घटक हवे असतात. मुठभर लोक केंद्र स्थानी असणे आणि प्रादेशिक हिताचा विचार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या आधारे महाआघाडी केली जाऊ शकत नाही, असे जेटली म्हणाले.
अशा महाआघाडीत सहभागी होण्यासाठी पक्षांना गुन्हेगारी प्रकरणे मिटवायची असतात. अशा ऐनवेळच्या महाआघाडीपेक्षा सुसंगत, धोरण असलेले सरकार आपल्याला हवे. महत्वाकांक्षा असलेला समाज कधीही अशाप्रकारे आत्महत्या करणार नाही, असे जेटली म्हणाले.
चौकट
कर्जावर कर्जे दिल्यानेच बुडीत कर्जे वाढली… 
मोदी सरकारच्या काळात बुडीत कर्ज वाढली, या राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचाही जेटली यांनी समाचार घेतला. “युपीए’ सरकारनेच बॅंकांना कर्जवाटप 31 टक्‍क्‍यांपर्यंत करण्यास सांगितले होते. त्यामुळे अस्थिर आणि विश्‍वासार्हता नसलेल्या प्रकल्पांनाही कर्ज दिली गेली. तेथूनच बॅंकांची लूट सुरू झाली. हेच या समस्येचे मूळ आहे, हे कॉंग्रेस अध्यक्षांनी ओळखायला हवे, असे जेटली म्हणाले. कर्ज घेणाऱ्याची दिवाळखोरी निघत असताना बॅंकांना कर्जावर कर्ज वाटप करण्यास सांगितले गेले होते. विजय मल्ल्याच्या प्रकरणात आरबीआयने एसबीआयला दुसऱ्यांना पुनर्गठन करण्याची सूचना केली, होती, असे जेटली म्हणाले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)