कोल्हापूर – कोल्हापूरमधील शिवाजी पुलावर गुरुवारी भीषण अपघात झाला. यामध्ये वडणगे पाडली येथील ग्रामसेवक ठार झाले आहेत. संदीप सातलिंग तेली (वय 38, रा.अब्दुल लाट ता. शिरोळ)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
शिवाजी पुलावर क्रुझर जीप-दुचाकीच्या अपघातात मोटर सायकलस्वार पुलावरून नदीमध्ये पडला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशामन दल आणि पोलीस दल घटनास्थळी पोहचले. स्थानिकांच्या मदतीने नदीत मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी करवीर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.