ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर

सातारा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, स्वच्छ व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सातारा जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता निवडणूक क्षेत्रात रविवार दि. 24 मार्च 2019 रोजी खालील अटीस आधिन राहून स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यागृह, व्यापार, अद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स रिटेलर्स इ. या आस्थपनामधील कामगारांना रविवार दि. 24 मार्च 2019 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

मतदानाच्या दिवशी वरील निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा आस्थापनेतील, निवडणूक क्षेत्रातील उद्योगातील कामगार तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम, अखंडीत उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात येत आहे या आदेशाच्या अनुषंगाने संबंधितांनी आवश्‍यक ती उपाययोजना करावी. तसेच आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल याची दक्षता घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)