अतिरिक्त आयुक्तपदी गोयल यांची नियुक्ती

पुणे – महापालिकेच्या रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी शंतनू गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2012 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी असून सध्या ते भंडारा जिल्हाधिकारी पदी नियुक्त होते.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गोयल याच्या नियुक्तीने आता पालिकेत चार आयएएस अधिकारी असणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)