गोवारी हत्याकांड नव्हे अपघात ; पण गोध्रा अपघात नाही, तर हत्याकांड ! – राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी आदिवासींचा मोर्चा नागपुरात आला होता. त्या मोर्च्यावर लाठीमार करण्यात आला. त्यामध्ये एकूण ११४ गोवारी बांधव मृत्यूमुखी पडले होते, अशी गंभीर टीका भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. गोवारी समाजाच्या १९९४ साली झालेल्या आंदोलनामध्ये चेंगरा चेंगरी होऊन अनेक गोवारी बांधव मृत्यमुखी पडले होते. या घटनेला आता २५ वर्षे पूर्ण झाली असताना भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या तोंडावर घाणेरडे राजकारण करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

आज त्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी घडलेल्या घटनेचा कोणताही अभ्यास न करता बालीश अशी टीका भाजप करत असल्याचे सांगितले. गोवारी समाजाच्या आंदोलनामध्ये घडलेली घटना हा अपघात होता. पण गोध्रा हत्याकांड हा अपघात नाही तर ते घडवलेले हत्याकांड होते. त्यावेळेस गोवारी आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती, त्या आंदोलनाला तत्कालिन आदिवासी मंत्री भेटायला जाणार होते पण त्या आधीच चेंगराचेंगरी घडली आणि मोठा अपघात झाला. पण गोध्रा घटना अपघात नव्हती, ते जाणूनबुजून घडवलं गेलं. पण या परिस्थितीचा विपर्यास करत भाजपा बालीश टीका करत आहे, असे मत टकले यांनी व्यक्त केले आहे

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1111490983382917122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)