जिल्ह्यात आता गोवर – रुबेला लसीकरण मोहीम

पुणे – देशातून पोलिओचे उच्चाटन झाल्यानंतर आता केंद्र सरकारने गोवर, रुबेलाच्या आजारांना पळवून लावण्याचा विडा उचलला आहे. त्याकरिता देशातील काही राज्यानंतर आता महाराष्ट्रातील 15 वर्षाखालील बालकांसह शालेय विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला (एमआर) मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम येत्या 27 नोव्हेंबरपासून राज्यात सुरु होणार आहे. या मोहिमेंतर्गत नऊ महिन्यांपासून ते 15 वर्षापर्यंतच्या सुमारे पावणेचार कोटी मुलांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे.

देशातून पोलिओचा नायनाट केल्यानंतर पोलिओमुक्तीनंतर आता केंद्र सरकारने गोवर, रुबेलाच्या आजारातून लहान मुलांना मुक्त करण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर, देशात गोवर, रुबेला लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. लहान मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण मानले जात आहे. या आजाराची लस उपलब्ध असली तरी लहान मुलांमध्ये आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण खूप आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरु झाली आहे. मोहिमेंतर्गत मे पर्यंत राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेशांमध्ये मोहीम राबविली गेली. आतापर्यंत देशातील कोटी बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

पुण्यातही मोहीम राबविली जाणार आहे. त्या करिता महिन्याच्या बालकापासून ते वर्षापर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना ही लस मोफत दिली जाणार आहे. राज्यात कोटी लाख बालके, विद्यार्थी लसीकरणाचे लाभार्थी आहेत. नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरु होणार असली तरी पुढील पाच आठवड्यापर्यंत हे लसीकरण सुरु राहणार आहे. आरोग्य प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे,’ अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

‘पुण्यात लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. लसीकरणामध्ये पुण्यातील सर्व खासगी, सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या बैठका घेऊन लसीकरणाबाबतचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शाळांनी पालकांच्या बैठका घेऊन राज्य सरकारच्यावतीने मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पुण्यात खासगी, सरकारी अशा हजार शाळा असून त्यातील सुमारे लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर शाळेत न जाणाऱ्या महिन्यापुढील वयाची बालके अशी सुमारे सात लाख बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या लसीकरण विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शहा यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)