शासनाने शिष्यवृत्तीचा निधी वाढवावा

राजेश परजणे यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

कोपरगाव – शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत शिष्यवृत्तीधारकांना राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. पाचवीच्या विद्यार्थ्यास दरमहा 100 रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यास दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम अतिशय तुटपुंजी असून या निधीत वाढ करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केली असून याबाबत त्यांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

-Ads-

राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन केले आहे. शिक्षण विभागाकडून सध्या शिष्यवृत्तीधारक पाचवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. महागाईचा विचार करता या रकमेत वाढ होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या आधिक आहे.

आर्थिकदृष्ट्‌या त्यांची परिस्थिती नाजूक असते. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक मदत मिळाल्यास त्याचा गुणवत्ता वाढीसाठी फायदाच होईल, असे परजणे यांनी म्हटले आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत होण्याची गरज आहे. त्यासाठी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा पाचशे रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी परजणे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)