“केंद्र सरकार सोशल मीडियावर लक्ष्य ठेवणार नाही’

ऍटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितला ,निर्णय सरकारने घेतला निर्णय मागे

नवी दिल्ली : सोशल मीडियावर केंद्र सरकारकडून लक्ष्य ठेवण्यात येणार होते. याबाबतच्या याचिकाबदल केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्टामध्ये सांगितले की, आम्ही सोशल मीडिया कम्युनिकेशन हब स्थापन करण्याचा प्रस्ताव मागे घेत आहोतत्यानंतर केंद्र सरकारकडून याबाबतचे नोटिफिकेशन मागे घेण्यात आले आहे.

-Ads-

सुप्रीम कोर्टा मध्ये सरकारकडून ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले की, केंद्र सरकार सोशल मीडियावर लक्ष्य ठेवणार नाही आणि सरकार या पूर्ण प्रस्तावावर पुर्नविचार करत आहे. अशाप्रकारे सोशल मीडिया कम्युनिकेशन हब स्थापन करण्याच्या विरूध्द दाखल केलेल्या याचिकेचेसुप्रीम कोर्टाने खंडन केले. मागील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस दिली होती आणि विचारले होते की,’सरकार सोशल मीडियावर लक्ष्य ठेवून देखरेखीचे राज्य बनवणार आहे का’?

दरम्यान तृणमूल काॅग्रेसचे आमदार महुआ मोईत्रा याचे म्हणणे होते की, सोशल मीडिया वर लक्ष्य ठेवण्यासाठी केंद्र ही कार्यवाही करत आहे. यामुळे ट्विटर, फेसबुक,इंस्टाग्राम व ईमेल यामध्ये असलेली माहिती केंद्र सरकारला मिळेल.याने गोपनीयताच्या अधिकाराचे उल्लंघन होईल. यामुळे प्रत्येक व्यक्तीची खाजगी माहिती सरकारला मिळेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)