सरकारला मिळणार 28 हजार कोटी

रिझर्व्ह बॅंकेकडून अंतरिम लाभांश देण्यास मंजुरी

मुंबई – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) सरकारला 28 हजार कोटी रूपयांची अंतरिम लाभांशची रक्‍कम देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी आरबीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली हे या बैठकीस उपस्थित होते. सलग दुसऱ्या वर्षी आरबीआय सरकारला अंतरिम शिल्लक हस्तांतरित करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. याच मुद्द्यावरून सरकारबरोबर मतभेद झाल्याने आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संचालक मंडळाने देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीची समीक्षा केली. त्याचबरोबर आरबीआयच्या कॅपिटल फ्रेमवर्कच्या मर्यादेत लेखापरीक्षणानंतर 28 हजार कोटी रुपये अंतरिम शिल्लक सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरबीआय गव्हर्नर शक्‍तिकांत दास हे होते.

मागील आर्थिक वर्षात आरबीआयने सरकारला अंतरिम शिलकीच्या रूपात 10 हजार कोटी रुपये दिले होते.आरबीआयच्या या रकमेमुळे सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारला आपली आर्थिक तूट नियंत्रणात ठेवण्यात मोठी मदत मिळणार आहे.

या बैठकीला डेप्यूटी गव्हर्नर विरल आचार्य, एन एस विश्‍वनाथ, बी पी कानूनगो आणि महेश कुमार उपस्थित होते. त्याशिवाय भारत दोशी, सुधीर मांकड, मनीष सबरवाल, प्रसन्ना कुमार मोहंती, दिलीप संघवी, सतीश मराठे, एस गुरूमूर्ती, रेवती अय्यर आणि सचिन चतुर्वेदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)