मराठा मोर्चा: मोर्चांमध्ये शांतता राखण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांचे पाचारण 

मुंबई: राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या मोर्चाने काही ठिकाणी हिंसक वळण घेतले होते. येत्या ९ ऑगस्टपासून मराठा समाजाकडून राज्यभरामध्ये आंदोलनांची दुसरी फेरी फेरी सुरु होणार आहे. आंदोलनांदरम्यान गेल्या आठवड्यात भडकलेल्या हिंसाचाराची स्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून राज्यसरकारने  केंद्रीय सुरक्षा दलांची मदत घेण्याचे ठरवले आहे. गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर संघटनांकडून आंदोलनांना हिंसक वळण लागण्याची शक्यता असल्याचे म्हंटले आहे.
या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर “आमच्याकडे राखीव पोलिसांच्या तुकड्या आहेत परंतु जर राज्यात एकाचवेळेस अनेक ठिकणी आंदोलने झाल्यास राखीव पोलिसांची कुमक कमी पडू शकते त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्यशासनाने केंद्राकडे केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या पाठवण्याची विनंती केली आहे” अशी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)