उशीरा सुचलेले शहाणपण : धनंजय मुंडे 

मुंबई: केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता. उलट जनतेची माफी मागा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
चार वर्षे लुट केल्यानंतर आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे. गुजरात राज्याने पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात केली असताना महाराष्ट्र सरकारने मात्र फक्त पेट्रोलच्या भावात कपात करून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा संतापही मुंडे यांनी व्यक्त केला.
तर पेट्रोल-डिझेलचा दर कमी करण्याचा आणि त्यावरील व्हॅट कमी करण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय म्हणजे लोकांच्या डोळयात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याची टिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)