मोदी सरकारने इंधनदर 10 रूपयांनी कमी करावेत : ममता 

सिलिगुडी: मोदी सरकारने इंधनांचे दर किमान 10 रूपयांनी कमी करावेत. तसेच, पेट्रोलियम उत्पादनांवरील अधिभारही रद्द करावा, अशी मागणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केली. पेट्रोल, डिझेल दरांतील कपातीची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आल्यानंतर ममतांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्रही सोडले. त्या सरकारला जनतेच्या हिताशी काही देणे-घेणे नाही. सरकारला केवळ भाजपमध्येच रस आहे. इंधनांच्या चढ्या दरांमुळे अत्यावश्‍यक वस्तूंच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे, असे त्या येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)