असमान योजनेसाठी शासनमान्य ग्रंथालयांनी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवावेत 

कोल्हापूर  – राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन 2018-19 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आवश्‍यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी /हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय कार्यालयास दिनांक 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत पोहचतील असे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतंर्गत समान निधी योजना सन 2018-19 साठी ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ,साधन सामग्री,फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. राजाराममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रीयस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य. दिव्यांगण वाचकांसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करण्यासाठीचे अर्थसहाय्य. हस्तलिखितांचे कॉपीराईट, दुर्मिळ ग्रंथ व दस्तावेज, जुनी नियतकालिके, ऐतिहासिक रेकॉर्डस्‌ आणि सामग्री यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी अर्थसहाय्य. डिजिटल माहिती सेवा विभाग प्रस्थापित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय्य. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक ग्रंथालयासाठी अर्थसहाय्य. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf/gov.in हे संकेतस्थळ पहावे. योजनेचाच लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा नमुना सुधारित स्वरूपात असावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)