सरकारच्या अपयशी धोरणांचा भुर्दंड पडतोय सामान्यांच्या खिशाला- जयंत पाटील

मुंबई: प्लॅस्टिक बंदीवरून राजकारण चांगलेच पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी “प्लॅस्टिक बंदीला विरोध नाही पण दंडाच्या किमतीला विरोध आहे”, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले “विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना किमान दंड १ हजार रुपये, प्लॅस्टिक वापराबाबतचा दंड ५ हजार रुपये. आधीच नोटाबंदी, महागाई, इंधनवाढीने ग्रासलेल्या सामान्य माणसाच्या खिशात एवढे पैसे नसतात. सरकारच्या धोरणांच्या अपयशाचा भुर्दंड सामान्यांच्या खिशाला पडतोय.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यापारी वर्गाने सुद्धा प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करुन द्यावा. ५० मायक्रॉन पेक्षा अधिक जाडीच्या बॅगा चालू ठेवाव्यात. व्यापा-यांवरील दंडात्मक कारवाई शिथील करावी, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)