शासकीय कार्यालयांतही आता “मिशन स्वच्छता’

महापालिका देणार पत्र : विशेष “ड्राइव्ह’चे आवाहन

पुणे – रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा महापालिकेने धडाका लावला आहेच, परंतु आता महापालिकेच्या स्वत:च्या आस्थापनांमध्येही कारवाईला सुरूवात केली आहे. महापालिका वगळता अन्य शासकीय कार्यालयांमध्येही अशीच मोहीम सुरू करण्यासंदर्भात त्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

महापालिका भवनासह, सर्व शासकीय कार्यालयांच्या भिंती आणि कोपरेही पान, तंबाखु यांनी रंगलेले असतात. हेच चित्र सगळीकडे दिसते. त्यावर आळा बसावा, यासाठी महापालिकेने रस्ते आणि आस्थापना यामध्ये थुंकीबहाद्दरांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जात आहे.

शासकीय कार्यालयांमधीलही हे चित्र बदलावे आणि थुंकणाऱ्यांवर आळा बसावा, यासाठी त्यांनीही अशाप्रकारे “ड्राइव्ह’ घ्यावा, असे या पत्रात नमूद करणार असल्याचे मोळक म्हणाले. न्यायालय परिसरातही त्यांनी पथक पाठवून कारवाई केल्याचे मोळक यांनी सांगितले. शासकीय कार्यालयातीलही हे चित्र बदलणे आवश्‍यक असल्याने या सूचना करणार असल्याचे मोळक यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)