सरकारी मेगाभरती लवकरच 

25 हजार पदांसाठी देणार जाहिरात; सवर्ण आरक्षणही होणार लागू

मुंबई  – सरकारी नोकरीतील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली असून राज्य सरकारने विविध विभागांच्या जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. आता महसूल, पोलीस, ग्राम विकास, आरोग्य आदी विभागातील तब्बल 25 हजार रिक्त जांगासाठी लवकरच जाहिरात दिली जाणार आहे. या नव्या जाहिरातीनुसार महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांतील उमेदवारांनाही 10 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यात मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारच्या निर्णयानंतर सरकारच्या विविध विभागातील 72 हजार मेगाभरतीचा मार्ग मोकळा झाला. ही भरती दोन टप्प्यांत केली जाणार आहे. मराठा आरक्षण कायद्याची अधिसूचना निघाल्यापासून आतापर्यंत जलसंधारण, मत्स्य व्यवसाय, कृषी, वित्त व नियोजन, लोकसेवा आयोग आदी विभागांतील 4 हजार पदांसाठी जाहिराती देऊन नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आता विविध विभागांच्या आणखी 25 हजार पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. संभाव्य पदभरतीमध्ये प्रामुख्याने पशुसंवर्धन 860, वन 773, ग्राम विकास 13000 आरोग्य 5000, महसूल 1500, पोलीस 5000 विभागातील जागांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातही आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांतील उमेदवारांनाही 10 टक्के जागा आरक्षित ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. खुल्या वर्गातून हे आरक्षण दिले जाणार असल्याने त्यातील जागा कमी होणार आहेत. त्यासंदर्भात जाहिरातीमध्ये उल्लेख करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)