अंगणवाडी सेविकांना पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक

संग्रहित फोटो

पुणे – अंगणवाडी सेविकांना केंद्राने जाहीर केलेल्या मानधनवाढीसह सेविकांना म्हतारपणासाठी पेन्शन देण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करू, असे आश्‍वासन राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना गेल्या काही दिवसांपासून मंजूर झालेले वाढीव मानधन सुद्धा अद्याप मिळालेले नाही. हे मानधन मिळावे यासाठी सेविकांच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. गेले काही दिवसांपासून पुण्यातील महिला बाल कल्याण समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर ही त्याची दखल घेतली गेली नसल्याने अखेर मुबंई येथील आझाद मैदानावर काल आंदोलन घेण्यात आले. अंगणवाडी कृती समितीचे उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलने करण्यात आले.

यावेळी महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिष्टमंडळाने बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी या चर्चेत केंद्राने मंजूर केलेले वाढीव मानधन देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता सेविकांना 1500 रुपये तर सेवकांना 1250 तर मदतनिसांना 750 रुपये मानधनवाढ मिळणार आहे. इतर राज्याच्या प्रमाणे किमान 12000 रुपये मानधन व एकरकमी सेवासमाप्ती लाभाव्यतिरिक्त मानधनाच्या निम्मी मासिक पेन्शन या प्रमुख मागण्यासाठी ही निदर्शने करण्यात होती. ही मागणी सुद्धा या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)