सरकारी उच्चपदस्थांनी नैतिकता पाळावी : रामनाथ कोविंद

सीबीआय वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतींची सूचना 

नवी दिल्ली – सरकारी उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नैतिकता पाळणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही सुचना केली. ते म्हणाले या उच्चपदस्थांच्या वागण्यांवर सामान्य लोकांचे भवितव्य अवलंबून असल्याने त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या सीबीआयचे संचालक अलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादंगाचा विषय देशभर चर्चीला जात आहे त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतींनी केलेल्या सुचनेला महत्व आहे. ते म्हणाले की सरकार तसेच बॅंका, विमा कंपन्या आणि अन्य वित्तीय संस्थांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचा त्या संस्थेतील अन्य कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवरही चांगला-वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे निष्ठा, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा याचा खरा अर्थ या लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. संस्थात्मक शिस्त आणि डेडीकेशन यालाही खूप महत्व आहे. दक्षता आयोगाने दक्षता जनजागृती सप्ताहानिमीत्त हा कार्यक्रम आयोजित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)