सरकारी मदत नाहीच.., वकील संघटना सरसावली

अणे येथील छावणीला 11 हजार रुपयांचा चार टन हिरवा चारा दिला मोफत
अणे –
अणे (ता.जुन्नर) येथील चारा छावणीला सरकारच्या वतीने अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. जिल्ह्यातील विविध संघटना या छावणीला मदत करण्यास पुढे येत आहेत. यानुसार दक्षिण पुणे वकील संघटनेकडून येथील छावणीला मोफत हिरवा चारा पुरवण्यात आला.

तालुक्‍याच्या पूर्व भागातील गावात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न अजूनही गंभीर आहे. जुन्नर तालुक्‍यातील लोकभारती पक्ष व रुद्रा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून मे महिन्यापासून चारा छावणी अणे येथे सुरू आहे. या छावणीत अणे व पेमदरा परिसरातील 125 जनावरे दाखल झाली आहेत. त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था अनेक स्वयंसेवी संस्था व देणगीदारांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासाठी अद्याप शासनाने कोणतीही मदत केली नसल्याचे जुन्नर तालुका लोकभारती पक्षाचे अध्यक्ष खालील पटेल यांनी सांगितले. गुरुवार (दि.13) दक्षिण पुणे वकील संघटनेच्या वतीने 11 हजार रुपये किमतीचा चार टन हिरवा चारा मोफत देण्यात आला. वकील संघटनेचे सदस्य ऍड. प्रवीण नलावडे, अनुरुद्र चव्हाण, कल्याण शिंदे, अनिल शेगडे, राजेश खळदकर यांनी चारा छावणीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी लोकभारती पक्षाचे जुन्नर तालुका अध्यक्ष खली पटेल, उपाध्यक्ष महेश थोरात, अणे शाखा अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष सुनील कांबळे, कासम चौगुले, रुद्रा फाऊंडेशनचे सर्व सदस्य व पशुधन मालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)