सरकारकडे एचएएलला देण्यासाठी पैसे नाहीत पण दसॉल्ट नावाच्या विदेशी कंपनीला देण्यासाठी पैसे आहेत : अहमद पटेल

नवी दिल्ली: सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी मालकीच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या कंपनीला आर्थिक मदत देण्यासाठी किंवा त्यांची बिले देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहींत पण दसॉल्ट नावाच्या विदेशी कंपनीला देण्यासाठी मात्र त्यांच्याकडे पैसे आहेत हे कसले मेक ईन इंडिया? असा सवाल ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी उपस्थित केला आहे.

सराकरने पैसे न दिल्यामुळे या कंपनीला उधार पैसे घ्यावे लागले आहेत असा आरोपही पटेल यांनी ट्विटरवर केला आहे. राफेल कंपनीकडून अजून कोणतेही विमान भारतात आले नाही पण त्या आधीच भारत सरकारने त्यांना पेमेंट केले आहे असाही कॉंग्रेसचा आरोप आहे. दसॉल्ट ही फ्रांसची कंपनी असून त्या कंपनीकडूनच भारत सरकारने राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)