अडीचशे दहशतवादी मारल्याचा दावा सरकारी नव्हे : अमित शहा यांचा खुलासा

file photo

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या तळावर हवाई हल्ला करत बदला घेतला होता. मात्र भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे किती दहशतवादी मारले गेले याबाबत हवाई दलाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नव्हती. मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या हवाई कारवाईमध्ये अडीचशे दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा केला होता. भाजप अध्यक्षांचा या दाव्यावरून राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने अमित शहा यांचा हा दावा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते.

दरम्यान आज अमित शहा यांनी आपल्या अडीचशे दहशतवादी मारल्या गेलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण देताना म्हंटले आहे की आपण हा दावा सरकारचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर सामान्य चर्चेमधून दिला होता. याबाबत एका वृत्तपत्राने वृत्त दिले असून अमित शहा यांनी अडीचशे दहशतवादी मारल्याचा दावा अधिकृत नसून आपला वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)