सरकारी बॅंकांचा आज संप

नवी दिल्ली: सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आज बॅंक व्यवहार विस्कळीत होण्याची शक्‍यता आहे. विजया बॅंक आणि देना बॅंक या बॅंकांचे बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. बॅंक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा एका आठवड्यातला दुसरा संप असणार आहे. गेल्या शुक्रवारी (दि. 21) सरकारी बॅंकांमधील अधिकाऱ्यांच्या संघटनेने एकदिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. उद्याच्या संपामध्ये खासगी बॅंका सहभागी होणार नाहीत.

उद्याचा संप “युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स’ या 9 संघटनांच्या पालक संघटनेने पुकारला आहे. देशभरातील सुमारे 10 लाख बॅंक कर्मचारी आणि अधिकारी उद्याच्या संपात सहभागी होण्याची शक्‍यता आहे, असे संघटनेने म्हटले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)