सरकारी बँकांनी माझे पैसे परत घ्यावेत व अडचणीत असलेल्या जेट एअरवेजला वाचवावे – मल्ल्या

नवी दिल्ली – विविध बँकांचे कर्ज तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन थकविलेल्या जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून नरेश आणि अनिता गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर विजय मल्ल्या याने आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत सरकारी बँकांनी माझे पैसे परत घ्यावेत आणि अडचणीत असलेल्या जेट एअरवेजला वाचवावे असे म्हंटले आहे. कर्नाटक हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि इतर सर्व कर्जदारांना पैसे द्यावे यासाठी आपण द्रव मालमत्ता ठेवली असून याचा संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचविण्यासाठी मदत होईल, असा ट्विट विजय मल्ल्याने केला आहे.

कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी मी किंगफिशर एअरलाइन्स मध्ये ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली, पण कोणी याकडे लक्ष दिले नाही. आणि त्याऐवजी प्रत्येक शक्य त्या मार्गाने माझी अडवणूकच केली असल्याचा आरोप करत सरकारी बँकांनी सर्वोत्तम कर्मचार्यांसह भारतातील सर्वोत्कृष्ट विमानचालन आणि कनेक्टिव्हिटी असलेली किंगफिशर एअरलाइन्स कठोरपणे अयशस्वी ठरविली, सध्य सरकारने दुहेरी नीतीचा अवलंब केला. असे विजय मल्ल्याने दुसऱ्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

पुढे सलग विजय मल्ल्याने ट्विट करत, ज्या प्रमाणे सरकारी बँकांनी जेट एअरवेजला वाचविण्यासाठी प्रयत्न केले त्याच पद्धतीने किंगफिशर एअरलाइन्सला सुद्धा मदत मिळायला हवी होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी जेट एअरवेजला वाचविण्यासाठी दिलेली बेल आऊट पॅकेजेस पाहून आनंद झाल्याचे मल्ल्याने म्हंटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)