वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात दरांत सरकारकडून 25 टक्के वाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारने मुद्रित माध्यमासाठीच्या जाहिरात दरांत 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. त्या निर्णयाचा लाभ प्रामुख्याने मध्यम आणि छोट्या वृत्तपत्रांना होणार आहे. केंद्र सरकारशी संबंधित जाहिराती ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशनकडून जारी केल्या जातात. त्या जाहिरातींचा दर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतला.

हा निर्णय मंगळवारपासूनच (8 जानेवारी) लागू करण्यात आला. तो निर्णय तीन वर्षांच्या कालावधीसाठी अंमलात आणला जाईल. याआधी 2013 मध्ये सरकारने जाहिरात दरांत वाढ केली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आठव्या दररचना समितीने केलेल्या शिफारसींचा आधार घेऊन जाहिरात दरवाढ केली. तो निर्णय घेताना वृत्तपत्रासाठीच्या कागदाची दरवाढ, प्रक्रिया शुल्कातील वाढ आदी बाबी ध्यानात घेण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)