गांभीर्य जपणारा गंभीर

माणूस एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन काम करतो त्या क्षेत्रात यशस्वीही होतो. त्याच क्षेत्रात शेवटपर्यंत राहतो पंरतु त्याला समाजाचं काही घेणं देणं नसतं पण काही लोक असतात की कितीही उंचीवर गेले तरी आपण समाजाचे काही देणे लागतो, याची सामाजिक जाणीव ठेवून ते काम करतात त्यातीलच एक व्यक्तीमत्व म्हणजे पद्मश्री गौतम गंभीर.

गौतम गंभीर बारावीमध्ये असताना रणजी क्रिकेट सामना खेळला होता. तेथे चांगली कामगिरी झाली. त्याने क्रिकेटवर आपल लक्ष केंद्रित केले आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिला सामना 3 नोव्हेंबर 2004 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळुन सुरूवात केली. त्याने 58 कसोटी सामन्यात 4,154 धावा केल्या. 147 एकदिवसीय सामन्यात 5,238 धावा केल्या आहेत. 37 सामन्यांत त्याने देशाचं प्रतिनिधित्व केल आहे. त्याने 9 नोव्हेंबर 2016 रोजी इंग्लंड विरूध्द सामन्यानंतर निवृत्ती घेतली. गंभीर कडे दिल्ली क्रिकेट संघाचे कर्णधार पद होते. पण युवा खेळाडुंना संधी मिळावी यासाठी त्याने कर्णधार पद सोडले होते. क्रिकेट च्या मैदानावर तो काही वेळेला वादग्रस्त ठरला होता.

गंभीरचे क्रिकेट हे पहिले प्रेम कधीच नव्हते त्याला आर्मीत जायचे होते पण त्याला आर्मीत जाता आले नाही याचा पश्‍चात्ताप होत आहे. पण आर्मीत जाता आले नसले तरी गंभीरने निवृत्त झाल्यावर द गौतम गंभीर फॉउंडेशनची स्थापना केली. शहीद सैनिकांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च करणे, गरीब लोकांना जेवण देणे हे काम आपल्या फॉउंडेशनच्या माध्यमातून करत आहे.
काश्‍मीरमध्ये शहीद झालेल्या अब्दुल रशीद यांच्या मुलींचे अश्रु पाहून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्याने उचलला आहे. आतापर्यंत त्याने पन्नास जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलला आहे. अजून शंभर जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार आहे. सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाची त्याने भेट घेतली. या भेटीनंतर शहीद सैनिकांच्या मुलांना क्रिकेट सामने पाहण्याचे निमंत्रण दिल होते. लष्कर जवानांबद्दल आपुलकी सर्वांनाच आहे. त्यांचे प्रेम आणि आदर सोशल मिडीया पुरता मर्यादित नसून तो आपल्याला कामातून दाखवतो आहे. भगत सिंह आणि मदर तेरेसा ही गंभीरची प्रेरणा स्थाने आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्यांच्या -पासून लोक लांब राहण्याचा प्रयत्न करतात त्या तृतीयपंथीयांच्या कार्यक्रमात डोक्‍यावर ओढणी कपाळावर टिकली लावून हजर होतो. या कार्यक्रमानंतर सोशल मिडीयाने गंभीरचे खुप कौतुक केले होते. रक्षांबधनच्या दिवशी त्यांच्या कडून राखी बांधून घेतली होती. या विषयी बोलताना तो म्हणतो तुम्ही स्ञी आहात की पुरूष आहात ह्या पेक्षा तुम्ही चांगली व्यक्ती आहात हे महत्वाचे आहे.

सामाजिक कार्याबरोबर सोशल मिडीयावर ट्विटरच्या माध्यमातून तो सक्रिय असून तो चर्चेमध्ये असतो. भष्ट्राचाराचे आरोप झालेल्या अझरुद्दीनला ईडन गार्डनवर ऐतिहासिक घंटा वाजवण्याचा मान कसा दिला जाऊ शकतो या प्रश्‍नवर तो चर्चेत आला होता. काश्‍मीर प्रश्‍नावरून गंभीरने ओमर अब्दुल्लांना सुनावलं होत. पुलवामा हल्ल्यानंतर आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही आता युध्द करायला हवे अशी भूमिका त्याने व्यक्त केली होती. आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदक जिंकल्यावर इतर खेळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अस मत त्याने व्यक्त केल होत.

गंभीरला 2009 साली अर्जुन पुरस्कार देवुन गौरवण्यात आले होते. भारत सरकारने 2019ला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. जरी तो क्रिकेटच्या मैदानावर काही वेळेला वादग्रस्त ठरला असला तरी सामजिक कार्यात अग्रेसर ठरत आहे.

– प्रथमेश कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)