ब्रेकअप झाले; पण…

“बेबी’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या तापसी पन्नूने आता सिनेसृष्टीत स्वतःचे स्थान तयार केले आहे. सध्या चर्चेत असलेल्या “बदला’ मधील तिच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. “जुडवा-2’नंतर तापसीची गाडी सुसाट सुटली आहे. रुपेरी पडद्यावर बोल्ड आणि बिनधास्त, डॅशिंग व्यक्‍तिरेखा साकारणारी तापसी खासगी आयुष्यातही तशीच आहे. अगदी प्रेमसंबंधांबाबतही ती उगाचच आळोखेपिळोखे घेत, लाजत-मुरडत नाही.

ती म्हणते, खरं सांगायचं तर, अफेअरविषयी गोपनीयता बाळगणाऱ्या अन्य अभिनेत्रींसारखी मी नाही. कदाचित अनेक नायिकांना या अफेअरचा आपल्या करिअरवर परिणाम होईल अशी भीती वाटत असावी. पण मला अशी कोणतीही भीती वाटत नाही. कधी काळी माझाही कुणावर तरी जीव जडला होता. त्यानंतर ब्रेकअपही झाले. पण माझ्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही गळला नाही. उलट या ब्रेकअपमुळे माझ्यात जिद्द निर्माण झाली. कारण त्या मुलाने मला सोडून दिल्यामुळे माझा इगो हर्ट झाला होता. तेव्हापासून मी अफेअरपेक्षा करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

अशी ही तापसी पुरस्कारांबाबतही तीव्र शब्दांत मतप्रदर्शन करते. ती म्हणते, पुरस्कारांवर माझा विश्‍वास नाही. “बेबी’ चित्रपटातील माझ्या अभिनयाची सर्वदूर प्रशंसा झाली. मात्र त्यावर्षी मला एकही पुरस्कार मिळाला नाही. पुरस्कार तर दूरच पण मला नॉमिनेशनही मिळाले नाही. ऍक्‍शन श्रेणीतही माझ्या नावाचा समावेश झाला नाही. त्याच वेळी केवळ अंगप्रदर्शनाखेरीज काहीच केलेले नसलेल्या नायिकांना पुरस्कार दिले गेले. तेव्हापासून माझा पुरस्कारांवरचा विश्‍वासच उडाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)