नीरव मोदीच्या महागड्या चित्रांच्या लिलावातून मिळाले 55 कोटी

नवी दिल्ली -पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदी याच्याकडील जप्त केलेल्या महागड्या चित्रांचा लिलाव करण्यात आला आहे. या महागड्या चित्रांमधून आयकर विभागाला 55 कोटी रुपये मिळाले आहेत. मोदीच्या एकूण 68 पैकी 55 चित्रांचा लिलाव करण्यात आला आहे.

नीरव मोदीने आयकर विभागाचे 97 कोटी रुपये थकविले होते. त्यामुळे आयकर विभागाने त्याच्या चित्रांचा लिलाव केला. त्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात आली होती. या पेंटिंग्जचा लिलाव केल्यानंतर कंपनीचे कमिशन देऊन आयकर विभागाच्या खात्यात 55 कोटी रुपये जमा झाले आहेत. न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत या चित्रांच्या लिलावासाठी परवानगी मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)