28 दिवसांत 2 कोटी 10 लाख बालकांना गोवर-रुबेलाचे लसीकरण

मुंबई: राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या 28 दिवसांत 2 कोटी 10 लाख बालकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाचे सुमारे 60 टक्क्‌यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण झाले असून राज्यभरात 26 हजार ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत करण्यात आलेल्या परिरक्षण मोहिमेत राज्याला सुमारे 21 निकषांमध्ये 99 टक्के गुण मिळाले आहेत्‌, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.

27 नोव्हेंबरपासून लसीकरणाच्या मोहिमेस प्रारंभ झाला. दररोज सुमारे 10 लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते पुर्ण करण्यासाठी आरोग्ययंत्रणा प्रयत्न करीत आहे. सध्या ही मोहीम राज्यातील सुमारे 94 हजार शाळांमधून सुरु आहे. मोहिमेला सुरुवात होऊन एक महिना पुर्ण होण्याच्या आज सुमारे 2 कोटी 10 लाख बालकांना लसीकरण करण्यात यंत्रणेला यश आले आहे. ज्या बालकांना लसीकरण झाले नाही, त्यांच्यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लसीकरणादरम्यान ज्या बालकांना पालकांनी गैरसमजुतीतून लस दिली नाही, अशा पालकांकडून आता लसीकरणासाठी विचारणा होत आहे. शाळेशिवाय बालकांना लसीकरण करता येईल काय, अशा स्वरुपाचे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहेत. जी बालकांना लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी आता शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उर्दू शाळांमधून लसीकरणाला विरोध
काही विशिष्ट भागात, विद्यालयांमध्ये, उर्दू शाळांमध्ये लसीकरणासाठी विरोध होत होता. त्या पाश्वभूमीवर 20 डिसेंबरला आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध मुस्लीम संस्थाचे प्रतिनिधी आणि उलेमा बोर्डाचे अध्यक्ष यांच्या समवेत इस्लाम जिमखाना येथे बैठक झाली होती. यावेळी मुस्लीम समुदायांमध्ये गैरसमजातून जे मुद्दे समोर आले त्यावर चर्चा करण्यात आली. मुस्लीम समाजातील डॉक्‍टर त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेत काम करणारे डॉ.मुजीब यांनी यावेळी गोवर-रुबेला लसीकरण आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे, त्याचा शास्त्रीय आधार देत मार्गदर्शन केले. गैरसमज न करुन घेता पालकांना लसीकरणासाठी तयार करावे, याबातचा सकारात्मक संदेश धर्मगुरुंनी द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)