गोपाळपूर परिसरात बिबट्याची दहशत

संग्रहित छायाचित्र

दोन शेळ्यांवर हल्ला : पिंजरा लावण्याची मागणी

गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील गोपाळपूर येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.
परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे सिद्ध झाल्याने भीतीचे वातावरण आहे. यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन वेळेत पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-Ads-

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी रात्री गोपाळपूर येथील आप्पासाहेब खनसे यांच्या वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला केला. यातील एक शेळी त्याने जवळील उसात ओढून नेहली. तर एकीचा शेडमध्ये जीव घेतला. यामुळे गोपाळपूर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.गोपाळपूर हे जायकवाडी बॅक वॉटर परिसरातील गाव असल्याने हा भाग पाण्याचा आहे.

ऊस, केळी पिके घेतली जातात. यामुळे परिसरात बिबट्याला वास्तव्यासाठी चांगले वातावरण असते. रात्री वीज असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते. यामुळे वन खात्याने वेळेत पिंजरा लावून बिबट्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर काळे व वन विभागाचे पाठक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)